E-Shram Card Explain ई श्रम कार्डचे फायदे काय ? कोण लाभ घेऊ शकतो.संपूर्ण तपशील
केंद्र सरकारने e shram card ही नवीन योजना सुरू केलेली आहे . असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने 2021 यावर्षी ऑगस्ट महिन्यात हे पोर्टल सुरू केले आहे.याच्या माध्यमातून देशातील जवळपास 38 कोटी असंघटित कामगारांना याचा फायदा होणार आहे.e shram पोर्टल वर रजिस्ट्रेशन केल्यानंतर कामगारांना एक आधारकार्ड सारखे दिसणारे कार्ड देण्यात येईल , प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट असा युनिक नंबर (UAN Number) देण्यात येईल.ह्या कार्डच्या मध्यामतून केंद्रसरकारच्या योजनांचा फायदा त्यांना घेता येईल.e shram पोर्टल वर 31 डिसेंबर पर्यंत रजिस्ट्रेशन चालू करण्यात आलेले आहे.
त्या आधी लक्षात घ्या की हे e shram कार्ड म्हणजे काय ?
कार्डाला असेल विशिष्ट असा 12 अंकी नंबर देण्यात येईल. आणि तो देशात सर्व ठिकाणी ग्राह्य धरला जाईल.UAN नंबर हा कायम स्वरुपी नंबर आहे . प्रत्येक व्यक्तीला एक नंबर दिला जाईल.कुणाचाही नंबर सारखा नसेन .e shram कार्ड हे कायम स्वरुपी असल्यामूळे ह्या कार्डला Renew करण्याची कोणतीही आवश्यकता नाही.
E shram कार्ड नोंदणी केल्यानंतर जर तुम्हाला त्यामध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास ती तुम्ही स्वतः करू शकतात त्यासाठी तुम्ही e shram portal वर जावे लागेल आणि मोबाईल नंबर टाकून तुम्ही त्यामध्ये लॉगीन करा, त्यांनंतर तुम्हाला श्रम कार्डच्या माहितीमध्ये बदल करता येईल.
श्रम कार्डचे फायदे काय आहेत
1) श्रम कार्डला देशभरात मान्यता आहे.
2) PMSBY मार्फत 1 वर्षासाठी तुम्हाला 2 लाखाचा विमा सरकारकडून मोफत देण्यात येईल.
3) PMSBY मार्फत अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विम्याची संपूर्ण रक्कम (2 लाख रूपये) देण्यात येईल
4) तसेच अपघातामध्ये अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये देण्यात येईल.
5) ई- श्रम कार्डच्या माध्यमातून सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या सामाजिक व सुरक्षा लाभ योजना पुरवले जातील .
6) देशामध्ये आपत्ती किंवा महामारीच्या काळामध्ये जनतेला आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी ई- श्रम धारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
7) ज्यांनी ई- श्रम कार्ड काढले असेल त्यांना आर्थिक सहाय्य त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल.
8) देशातील सर्व असंघटित कामगारांना या योजनेमध्ये सामावून घेतले जाईल.
E- shram (ई- श्रम) काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) चालू मोबाईल नंबर (OTP साठी)
3) KYC साठी व्यक्ती स्वतः हजर असणे आवश्यक.
4) बँक पासबुक (Bank Passbook)
5) Nominee (वारसदार) लावण्यासाठी घरातील एका व्यक्तीचे आधारकार्ड (नाव,जन्मतारीख, नाते इ.माहिती भरण्यासाठी )
असंघटित कामगार कोण आहेत
1) लहान आणि सीमांत शेतकरी /शेतमजूर
2) पशुपालन करणारे
3) विडी कामगार
4) बांधकाम करणारे मजूर
5) सेंट्रिंग कामगार
6) लेदर कामगार
7) सुतार
8) वीटभट्टीवर काम करणारे मजूर
9) न्हावी
10) घरची कामं करणारे मजूर. घरकामगार
11) भाजीपाला विक्रेते
12) फळ विक्रेते
13) वृत्तपत्र विकणारे
14) हातगाडी ओढणारे
15) ऑटो रिक्षा चालक
16) आशा कामगार
17) दूध उत्पादक शेतकरी
18) सामान्य केंद्रचालक
19) स्थलांतरित कामगार व इतर सर्व कामगार
20) घरगुती कामगार
कुणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही
1) ई- श्रम कार्ड फक्त असंघटीत कामगारांसाठी आहे
2) त्यामुळे EPFO किंवा ESIC चे सदस्य ई - श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकणार नाही.
नोंदणी कुठे करावी ?
ज्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे असे व्यक्ती स्वतः ई श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकतात.परंतु ज्यांचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल त्यांना जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन नोंदणी करावी लागेल. E-Shram कार्डची नोंदणी मोफत आहे.देशातील 38 कोटी असंघटित कामगारांना या योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा निर्णय आहे .त्यामुळे अधिकाधिक लोकांनी e shram कार्ड काढावे .